Saturday, July 11, 2009

चारोळी












दूर गेले मी कितीही तरी
तुझी आठवण मात्र मनात कायम राहिल
तुझ्या मैत्रीत घालवलेल्या प्रत्येक क्षणांचा गोडवा
मनाला आयुष्यभर आनंद देत राहिल...


-----------------------------------------

प्रेम हे प्रेम असते
त्याला कसलेच मोल नसते
प्रेमाला विकत घेवू बघणारयाइतके
जगात कोणी मुर्ख नसते..
-----------------------------------------

आयुष्यात काही प्रश्नांची उत्तर
कधी कधी मिळत नाही
आणि मिळालीच कधीतरी
तर मन त्याला मानत नाही..
-----------------------------------------


खूप काही कळत असल
तरी सगळच काही सांगता येत नाही...
खूप काही हव असल
तरीही सगळच काही मागता येत नाही..
-----------------------------------------


मैत्री म्हणजे
कधी रुसावे कधी हसावे
मी काही न बोलताच
तू सगळे ओळखावे..
-----------------------------------------


स्वार्थामध्ये हरवून जाऊन
आयुष्य जगणे व्यर्थ असते
दुसऱ्यासाठी जावून बघा कधीतरी
हे आयुष्य स्वर्गाहून खुप काही वाटते..

आयुष्य..














एकदा विश्वासला तडा गेला की नाते तुटतात.....
आणि नाते तुटले की मग
आयुष्यामधे खुप काही गमवावे लागते.....
पण नंतर जे उरते तिचातच मन रमवावे लागते......
नविन नाती जोडावी लागतात....
मग जुन्या आठवणी पुसट होत जातात....
नविन आठवणी मनात घर करतात..
यालाच आयुष्य जगणे म्हणतात...

प्रेम कधी स्वार्थी नसाव..





















आयुष्यामध्ये प्रत्येकाने
एकदा तरी जरुर प्रेम करावे
पण प्रेम कधी स्वार्थी नसाव

आपली जीवाभावाची नाती
एका क्षणात परकी वाटतील
इतके आंधळ नसावे


आयुष्यातली आपली ध्येयही
प्रेमाचा रंगेल दुनियेत हरवून जावी
इतके प्रेम स्वार्थी नसावे

प्रेम असावे ते एक खळखळणारया
झरयाप्रमाणे निस्वार्थी निरपेक्ष असे

प्रेम असावे फुलासारखे
फुलपाखरासारखे स्वार्थी नव्हे

आपण फ़क्त प्रेम करत रहावे
पण कोणात आपण इतके
हरवून न जावे की
आपणच आपले अस्तित्व विसरून जाव
प्रेम कधीही स्वार्थी नसावे..